शोकवार्ता
पोलीसनामा घाटंजीचे वार्ताहर अयनुद्दीन सोलंकी यांच्या मातोश्रींचे निधन
घाटंजी : पोलीसनामा दैनिकाचे घाटंजी तालुका वार्ताहर अयनुद्दीन सोलंकी यांच्या मातोश्री बतुलबी शमसुद्दीन सोलंकी (वय 80) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन पुत्र, दोन कन्या तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर कुर्ली (ता. घाटंजी) येथील मुस्लिम कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारावेळी विविध मान्यवर, धर्मगुरू आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
पोलीसनामा परिवारातर्फे बतुलबी सोलंकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि सोलंकी परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. 🌹🙏
Views: 229














