​यवतमाळ: ३ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेले प्रभारी बीडीओ सखाराम इसलकर यांचे प्रकरण अंतिम टप्प्यात; २७ ऑक्टोबर रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी!


नेर पन्चायत समितीचे सन्शयीत आरोपी प्रभारी गट विकास अधिकारी एस. जे. इसलकर (नेर) यांनी 3000 रुपयाची लाच स्विकारल्या प्रकरणी नेर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबन्धक कायदा 1988 कलम 7, 13 (1) (ड), सहकलम 13 (2) अन्वये गुन्हा नोन्द

➡️ यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात 27 आक्टोबर 2026 रोजी पुढील सुनावणी 

यवतमाळ घाटंजी : पोलीसनामा (अयनुद्दीन सोलन्की)

नेर पन्चायत समितीचे विस्तार अधिकारी (पन्चायत) व, तथा प्रभारी गट विकास अधिकारी एस. जे. इसलकर हे नेर पन्चायत समिती कार्यालयात कार्यरत असतान्ना चिकणी डोमगा गावातील तन्टामुक्त गाव समिती पुरस्काराच्या रकमेबाबत प्रलम्बीत तक्रारीची चौकशी बन्द (निल) करतो, तसेच मान्गलादेवी येथील अन्गणवाडी बान्धकामाचे मोजमाप करण्याचे आदेश करतो, असे म्हणून 3000 रुपये लाचेची रक्कम स्विकारल्या प्रकरणी, सन्शयीत आरोपी घाटंजी पन्चायत समितीचे (पन्चायत) विस्तार अधिकारी सखाराम जयवन्तराव इसलकर विरुद्ध लाचलुचपत प्रतिबन्धक कायदा, 1988 अन्तर्गत पोलीस उप अधिक्षक सतीश मोरेश्वरराव देशमुख (वय 51 वर्ष) यांच्या फिर्यादी वरुन नेर पोलीस ठाण्यात दि. 04 फेब्रुवारी 2014 रोजी गुन्हा नोन्दविण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबन्धक विभागाने करुन सदर प्रकरणात यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर Spl.case. ACB/09/2014 प्रकरण सद्यातरी प्रलम्बीत असुन, सदर प्रकरणाची सुनावणी 27 आक्टोबर 2026 रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. यु. बघेले यांच्या न्यायालयात सुरु आहे. सदर प्रकरणात शासनाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ADV. MANGESH S. GANGALWAR हे मान्डत आहे. तर, सन्शयीत आरोपी सखाराम इसलकरचे काम ADV. राजेश साबळे हे पाहत आहे.

बोरगांव (लिंगा) [पन्चायत समिती नेर] येथील ग्रामपन्चायत सचिव गणेश सुर्यभानजी सुगदे हे तेथे कार्यरत असतान्ना चिकणी डोमगा या गावला महात्मा गान्धी तन्टामुक्त गाव समितीला 2 लाखाचा पुरस्कार मिळाला होता. सदर रक्कम ग्रामपन्चायतीचे विकासकामासाठी खर्च करण्यात आला होता. सदरची रक्कम मनमानी पद्धतीने खर्च करण्यात आल्याची तक्रार चिकणी डोमगा येथील रामप्रसाद राठोड व इतरांनी नेर पन्चायत समितीला केली. सचिव गणेश सुगदे यांनी मान्गलादेवी गावात अन्गणवाडीचे काम नियमानुसार केले होते. विशेष म्हणजे सदर दोन्ही प्रकरणात नेर पन्चायत समितीला तक्रार करण्यात आली. सदर दोन्ही प्रकरणाची चौकशी तत्कालीन गट विकास अधिकारी जाधव यांनी नेरचे विस्तार अधिकारी (पन्चायत) सखाराम इसलकर यांचेकडे दिले. या वेळी सखाराम इसलकर यांनी सचिव गणेश सुगदे यांना म्हटले की, मला नेर गट विकास अधिकारी (BDO) यांचे दोन पत्र आले आहे. आपल्या म्हणजेच सचिव सुगदे यांचा ग्रामपन्चायतचा रेकार्ड तपासा म्हणून. त्यामुळे सचिव गणेश सुखदे हे ग्रामपन्चायत कार्यालयात उपस्थित होते. परन्तू विस्तार अधिकारी (पन्चायत) एस. जे. इसलकर हे आलेच नाही. तदनन्तर सखाराम इसलकर यांचेकडे नेर येथील गट विकास अधिकारी यांचा ‘प्रभार’ असतान्ना, चिकणी डोमगा येथील प्रलम्बीत असलेली चौकशी पुर्ण करण्यासाठी व अन्गणवाडी बान्धकामाचे मुल्याकन करुन द्यावे, अशी विनंती एस. जे. इसलकर यांना केली असता, एस. जे. इसलकर यांनी सचिव सुगदे यांना एकविरा कालनी येथील राहते घरी भेटण्यासाठी सांगीतले. सचिव सुगदे हे इसलकर यांचे घरी गेल्यावर त्यान्नी सचिव सुगदे यांना चिकणी डोमगा चौकशीचे प्रकरण निपटवून देण्यासाठी व मान्गलादेवी येथील मुल्यान्कन करुन देण्यासाठी 5000 रुपयाची लाचेची मागणी केली. तसेच, जवळ काही पैसे असतील तर आत्ताच देऊन दे, असे सखाराम इसलकर म्हणाले. माझे जवळ त्यावेळी 2000 रुपये होते. नाईलाजाने माझ्या जवळील 2000 रुपये इसळकर यांना नगदी दिले. तसेच उर्वरित रक्कम 3000 रुपये नन्तर देतो असे इसलकर यांना सान्गीतले. त्यानन्तर 31 जानेवारी 2014 रोजी सचिव सुगदे व इसलकर यांची नेर पन्चायत समिती कार्यालयात भेट झाली व या वेळी इसलकर सचिव सुगदे यांना म्हणाले की, तुझे दोन्हीही काम करुन देतो. तुझे काम झाल्यासारखेच आहे. राहीलेले 3000 रुपये लवकर देऊन टाक. तेव्हा, सचिव गणेश सुगदे यांनी पगार झाल्यावर पैसे देतो, असे म्हणून निघून गेला. सचिव गणेश सुगदे हे दि. 04/02/2014 रोजी 3000 रुपये देण्याची तयारी दर्शविली. दि. 03/02/2014 रोजीच पन्चनामा करुन, दि. 04 फेब्रुवारी 2014 रोजी नेर पन्चायत समिती कार्यालयात लाचलुचपत प्रतिबन्धक विभागाने सापळा रचला. या वेळी पन्चनाम्यामध्ये नमुद असल्याप्रमाणे 3000 रुपये घेतान्ना रन्गेहात पकडण्यात आले. सदर लाचेची रक्कम 3000 रुपये लाचलुचपत प्रतिबन्धक विभागाने जप्त करुन, सन्शयीत आरोपीचा फुलपन्ट सुद्धा जप्त केला. या प्रकरणी नेर पोलीस ठाण्यात सखाराम इसलकर विरुद्ध लाचेचा गुन्हा नोन्दविण्यात आला.

सदर प्रकरणाची सुनावणी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु असुन, पुढील सुनावणी 27 आक्टोबर 2026 रोजी होत आहे. सदर खटला अन्तीम टप्प्यावर असुन सदर प्रकरणात लवकरच न्याय निर्णय होण्याची शक्यता विधी विभागाने वर्तविली आहे.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!