व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पुलगाव शहर व देवळी तालुका कार्यकारिणीची घोषणा


‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पुलगाव शहर व देवळी तालुका कार्यकारिणीची घोषणा; ”शिव प्रेरणा’ चे संपादक पंकज द्वारकाप्रसाद तिवारी यांची पुलगाव शहर अध्यक्षपदी निवड! आणि पोलीसनामा’चे संपादक प्रफुल भटकर यांची देवळी तालुकाध्यक्षपदी निवड!

पुलगाव/देवळी | पोलीसनामा विक्रम उईके-

पत्रकारांच्या हक्कासाठी व संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पुलगाव शहर व देवळी तालुका नूतन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘पोलीसनामा’चे संपादक प्रफुल दशरथराव भटकर यांची देवळी तालुका अध्यक्षपदी तर पंकज द्वारकाप्रसाद तिवारी यांची पुलगाव शहराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पुलगाव येथील बालाजी पॅलेस येथे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘पोलीसनामा’चे उपसंपादक प्रफुल भटकर यांची देवळी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वृत्तपत्र, डिजिटल मीडिया आणि सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नरेंद्र देशमुख व प्रमोद पानबुडे यांचा सत्कार

या बैठकीदरम्यान ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरेंद्र देशमुख तसेच राज्य प्रवक्ते प्रमोद पानबुडे यांच्या नूतन नियुक्तीनिमित्त पुलगाव शाखेच्या वतीने त्यांचा भावूक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

देवळी तालुका कार्यकारिणी:

अध्यक्ष: प्रफुल दशरथराव भटकर ( संपादक – पोलीसनामा)

उपाध्यक्ष: राजू सदाशिव वटाणे

सचिव: किरण राऊत

सहसचिव: मयूर देवघरे

कोषाध्यक्ष: संतोष तुरक

प्रवक्ते: अविनाश भोपे

पुलगाव शहर कार्यकारिणी:

अध्यक्ष: पंकज द्वारकाप्रसाद तिवारी

उपाध्यक्ष: अमीन ओलिया व ज्ञानेश्वर गोटे

सचिव: चंद्रकांत पवार

सहसचिव: मनोज श्रीवास

कोषाध्यक्ष: हर्षल काळे

सहकोषाध्यक्ष: जय महल्ले

सदस्य: दीपक तिवरे, मनोज वैद्य व कुणाल चिचाटे

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार

कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या विविध समस्या, सुरक्षा व हक्कांसाठी तसेच संघटनात्मक बळकटीसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘पोलीसनामा’चे उपसंपादक प्रफुल भटकर यांच्या नेतृत्वाखाली देवळी तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश शेंडे, पंकज तिवारी, अमीन ओलिया, चंद्रकांत पवार, मनोज श्रीवास, हर्षल काळे, जय महल्ले, दीपक तिवरे, मनोज वैद्य, कुणाल चिचाटे, ज्ञानेश्वर गोटे, राजूभाऊ वटाणे, किरण राऊत, अविनाश भोपे, संतोष तुरक, मयूर अवसरे व मयूर देवघरे यांनी परिश्रम घेतले.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!