३५५ वर्षांची परंपरा; उत्सवाचे महत्त्व आजही कायम. अद्भुत कृतज्ञता. आज जणू उमरा मध्ये दिवाळीच !


बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उमरा गावातील द्वारका उत्सव

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील उमरा आज दिनांक 11.09.2026 वार शुक्रवार ला ३५५ वर्षांची परंपरा; उत्सवाचे महत्त्व आजही कायम

पोलीसनामा अकोला (उमरा): सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील उमरा गावात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक द्वारका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल ३५५ वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाचे महत्त्व आजही ग्रामस्थांनी जपले आहे.

शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे स्थान आजही महत्त्वाचे आहे. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.

या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे बैलगाडीला अतिरिक्त दोन चाके लावून त्याला आकर्षक पद्धतीने सजविले जाते. या सजविलेल्या रचनेला ‘मखर’ असे म्हणतात. त्यामध्ये बैलांना चढवून त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजत-गाजत गावातून बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात येते.

यावर्षीही उमरा गावात पारंपरिक पद्धतीने द्वारका उत्सव साजरा करण्यात येनार. उमरा गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्सवाला मोठी गर्दी होते सजविलेल्या मखरांमध्ये बैलांना घेऊन काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे गावातील वातावरण उत्साहपूर्ण होते.

रोगराईपासून बैलांचे संरक्षण व्हावे, म्हणून साकडे

या उत्सवामागे एक जुनी आख्यायिका सांगितली जाते. जुन्या काळात गावामध्ये बैलांवर रोगराई पसरली होती. त्यामुळे गावातील नागरिक चिंतेत होते. त्यावेळी ग्रामस्थांनी वाकाजी महाराजांना साकडे घातले की, बैलांवरील ही रोगराई नाहीशी झाली तर आम्ही बैलांना मखरातून सजवून वाजत-गाजत मिरवणूक काढू.

रोगराई दूर झाल्यानंतर ग्रामस्थांनी आपला नवस पूर्ण केला आणि बैलांची मखरातून मिरवणूक काढण्याची ही परंपरा सुरू झाली, अशी आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते. तेव्हापासून पिढ्यान्‌पिढ्या हा उत्सव श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

३५५ वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळा नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते जपणारी परंपरा आहे. आधुनिक युगातही ग्रामस्थांनी ही परंपरा जिवंत ठेवली असून, पुढील पिढीपर्यंत ती पोहोचविण्याचा संकल्प केला आहे.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!