सिमेंट रस्त्याच्या बांधकामात नियोजनाचा अभाव अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचे नगरसेवक अनिल कारोटकर यांची तक्रार


सिमेंट रस्त्याच्या बांधकामात नियोजनाचा अभाव अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचे नगरसेवक अनिल कारोटकर यांची तक्रार

पोलीसनामा देवळी प्रतिनिधी. वर्धा

दोन कोटीच्या खर्चाने नगरपरिषद माध्यमिक शाळा ते आठवडी बाजार चौकापर्यंतचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम होत असून सदर बांधकाम नियोजन पूर्ण होत नसल्याची तक्रार नगर परिषद सदस्य अनिल कारोटकर यांनी केली आहे.

सदर बांधकाम 240 मीटर लांब व बारा मीटर रुंदीचे असून सिमेंट काँक्रेट चे करण्यात येत आहे . सदर बांधकाम सुरू झालेल्या पासून नियोजन पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी वारंवार करून सुद्धा त्यांच्या तक्रारीकडे व नगरपरिषद सर्व साधारण सभेमध्ये सुद्धा चर्चेला आल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे नगरपरिषद प्रशासनाची डोळे झाक होत असल्याचे दिसून येत आहे सदर बांधकाम बांधकाम अभियंत्याच्या देखरेख होत नसून तेथे काम करणारे मजूरच सर्व कामे आपल्या पद्धतीने करीत असल्यामुळे रस्ता बांधकाम कोठे गड्डा कुठे उंचवटा व सिमेंट मिश्रनाची सुद्धा तपासणी अभियंत्याकडून पूर्ण झाल्यावरच काँक्रीट पसरविण्यात यायला पाहिजे पण तसे होत नसल्याचे नगर नगरसेवकांनी तक्रारीमध्ये नमूद केलेले आहे. या रस्त्याच्या मध्यभागी चार ते पाच मोठी झाडे व डिव्हायडर व स्ट्रीट लाईटचे खांब उभे आहे. ते काढून रस्त्याचे काम करावयास पाहिजे होते पण तसे न करता कॉन्ट्रॅक्टरणे सरळ सरळ सिमेंट काँक्रेट अंथरण्याचे काम केले आहे. रस्ता बनविण्या करिता मिक्सर मशीनने काँक्रिट टाकल्या नंतर तासंतास व्हायब्रेटिंग मिशीनचा उपयोग नकेल्याने रस्त्याच्या भराईवर प्रश्न निर्माण होत आहे.

शहरातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर पोस्ट ऑफिस बँका शाळा शॉपिंग कॉम्प्लेक्स व मोठ्या प्रमाणात रहदारी असते. रहदारीचा रस्ता असल्यामुळे हा रस्ता रुंदीकरणासह मजबूत बांधकाम होणे गरजेचे आहे. या रस्त्याच्या संदर्भात नगरसेवक अनिल कारोटकर नगरपरिषद विरोधी पक्षनेते अशोक राऊत यांच्यासह इतर नगरसेवकांनी या रस्त्याच्या संदर्भात वारंवार तक्रारी व सूचना देऊन सुद्धा मुख्यधिकारी नेहा आकोडे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे आरोप होत आहे.

मागील एक वर्षापासून नगरपरिषद मध्ये बांधकाम अभियंताच नाही

देवळी नगर परिषदेमध्ये बांधकामावर नियंत्रण व इस्टिमेट तयार करण्याकरता पूर्णवेळ बांधकाम अभियंता नसल्यामुळे अनेक कामे रखडलेली असून व सुरू असलेल्या बांधकामावर कोणाचेही नियंत्रण व देखरेख नाही त्यामुळे बांधकामाचा दर्जा ढासळला असल्याचा नागरिक व नगरसेवकांनी आपल्या संवादातून बोलून दाखविलेले आहे. प्रकलनानुसार रस्त्याच्या जुन्या दुभाजकावर स्टीलचे रेलिंग लावणे, आवश्यक ठिकाणी नाली बांधकाम व रस्त्याच्या दोन्ही बाजूने पेवर ब्लॉक बसविणे अशी कामे नियोजित आहेत. व रस्त्याच्या मध्यभागी चार ते पाच मोठी झाडे येत असल्याने वन विभागाने या झाडाचे नगरपालिका मुख्याधिकारी यांना मूल्यांकन दिले असून. त्यांच्या अध्यक्षतेत नगरपालिकेतील वृक्ष समिती गठीत केली आहे. परंतु या समितीच्या वतीने अद्यापही रस्त्याच्या मध्यभागी आलेल्या झाडे तोडण्याचा निर्णय न घेतल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत कंत्राटदार आपली सर्व जबाबदारी नसल्याचे हात झटकून काम बंद करण्याच्या तयारीत आहे.

काम त्वरित करा

दसरा आणि दिवाळी सण लवकरच येत असल्याने सदर रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक ,नागरिक तसेच लहान दुकानदारांनी केलेले आहे. याची देवळी नगरपालिकेने त्वरित दखल घेऊन ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

प्रतिक्रिया
सदर रस्त्याचे काम नियमानुसार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.
 हा सिमेंट रोड माझ्या प्रभागात येत असून हा रस्ता देवळी शहरातील मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्याचे काम नियमानुसार झाले पाहिजे स्ट्रीट लाईट, रस्ता दुभाजक आणि झाडे हे नियमानुसार काढून अभियंताच्या देखरेखीखाली या रस्त्याचे बांधकाम इस्टिमेट नुसार झाले पाहिजे मी अनेक वेळा या रस्त्याबाबत तक्रार केली असून माझ्या तक्रारीची कोणतीच दखल नगरपालिका प्रशासनाने घेतलि नाही.
 नगरपालिका प्रशासन मनमानी अर्थपूर्ण कारभार करीत आहे जर माझ्या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही तर मी नगरपालिका समोर तीव्र आंदोलन छडून उपोषणास बसिन तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी. 
 नगरसेवक अनिल कारोटकर, नगरपरिषद देवळी


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!