घाटन्जी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सव ‘डीजे’ मुक्त साजरा करण्याचे आवाहन; पान्ढरकवडा उप विभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (IPS)
यवतमाळ : पोलीसनामा अयनुद्दीन सोलन्की
आगामी गणेशोत्सव व अन्य सण – उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे, या साठी घाटंजी पोलीस प्रशासनाच्या वतीने घाटन्जी शहरातील सोनू मंगलम येथे शांतता समितीची सभा घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक, व तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (IPS) हे होते. तर या वेळी घाटन्जी पोलीस स्टेशनचे ठाणेदार, व तथा पोलीस निरिक्षक केशव ठाकरे उपस्थित होते.
या वेळी उप विभागीय पोलीस अधिकारी ROBIN BANSAL (IPS) यांनी गणेशोत्सव ‘डीजे’ मुक्त साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले. मोठ्या आवाजातील डीजे मुळे लहान मुले, वृद्ध तसेच गर्भवती महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन बन्सल यांनी केले.
शासनाने उत्सवांसाठी घालून दिलेल्या नियम व निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सर्वांनी सामाजिक सलोखा कायम ठेवत सण – उत्सव साजरे करावे, असे आवाहन पोलिस प्रशासना तर्फ करण्यात आले.
बैठकीला घाटन्जी तालुक्यातील शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे अध्यक्ष, व तथा पदाधिकारी, ग्रामीण भागातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी, बातमीदार तसेच स्थानिक नागरिक आवर्जुन उपस्थित होते.
या वेळी ठाणेदार, व तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, पोलिस उप निरीक्षक विनाश जाधव, पोलीस उप निरीक्षक अशोक मडावी, ठाणेदार यांचे रायटर दिनेश जाधव, गोपनीय विभागाचे अमोल कोवे आदी, व तथा इतर घाटन्जी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक, महीला पोलीस व इतर पोलीस शिपाई आदी उपस्थित होते.














