महाआरतीनिमित्त एस एम डब्लू इस्पात प्रा. ली तर्फे पर्यावरण जनजागृती


महाआरतीनिमित्त एस एम डब्लू इस्पात प्रा. ली तर्फे पर्यावरण जनजागृती

पोलीसनामा देवळी : येथील SMW ISPAT PVT. LTD. कारखाना परिसरातील मंदिरात दुर्गा माता महाआरतीनिमित्त पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शासनाच्या *‘एक पेड माँ के नाम’* अभियानातून प्रेरणा घेत कंपनीचे संचालक *श्री. दीपक सुमद*, उपाध्यक्ष *श्री. श्याम मुंदडा* आणि उपाध्यक्ष *श्री. रमेश नाथ* यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन आणि वृक्षारोपणाचा संकल्प केला.

यावेळी श्री. दीपक सुमद, श्री. श्याम मुंदडा आणि श्री. रमेश नाथ यांनी कर्मचाऱ्यांना पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. *“पाणी वाचवा, देश वाचवा”* हा संदेश देत पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून, पाण्याची बचत ही केवळ आजची गरज नसून भविष्यातील पिढ्यांसाठीची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच, *श्री. श्याम मुंदडा यांनी कर्मचाऱ्यांना भविष्यातील पर्यावरणाचा विचार करून अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आणि लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांनी पर्यावरणपूरक घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन *जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्तीबाबत* जनजागृती केली.

“पाणी वाचवा, झाडे लावा आणि निसर्ग जपा — पर्यावरण संरक्षण हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली!”


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!