यवतमाळ: निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधकांना दणका; ५५ संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर, १ ऑगस्टला पुढील सुनावणी
घाटंजी : पोलीसनामा ऑनलाइन (अयनुद्दीन सोलन्की)
घाटन्जी तालुक्यातील ताडसावळी – खडका शिवार येथील आंतरराज्यीय निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू असतांना धरण विरोधी संघर्ष समिती, सावळी सदोबा व इतर परिसरातील गावकऱ्यांनी बेकायदेशीर जमाव करून, दहशत निर्माण करुन, शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी ५३ संशयित आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ६१६/२०२५ अन्वये पारवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १३२, १८९ (२), १९१ (२) (३), १९०, ३२४ (५), ३२९ (३) सह कलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, सह कलम ७ फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम अंतर्गत ५३ संशयित आरोपी विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले होते.
दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी पक्षाचे वकील व सरकारी पक्षाचे सहाय्यक सरकारी वकील ॲड. अरुण मोहोड हे न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, सदर प्रकरणातील ५३ संशयित आरोपींनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या न्यायालयात ॲड. अजय डाखोरे यांच्या मार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
यात तत्कालीन जिल्हा सरकारी वकील ॲड. पी. व्ही. गाडबैले, ॲड. अजय डाखोरे व ॲड. निलेश चवरडोल (घाटंजी) आदींनी न्यायालयात युक्तीवाद केला. सद्यातरी ५३ संशयित आरोपी हे नियमित जामीनावर आहे.
दरम्यान, याच प्रकरणात आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती विजय सिताराम राऊत, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक असगरअली तंवर, धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप सह ५५ संशयित आरोपी विरुद्ध पारवा पोलीसांनी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रविण पाटील यांच्या न्यायालयात २७ जानेवारी २०२६ रोजी दोषारोपपत्र (CHARGESHEET) सादर केले आहे. सदर प्रकरण संमसच्या पतीक्षेत असुन सदर प्रकरणात शासनाची बाजू सहाय्यक सरकारी अधिवक्ता ॲड. ज्ञानेश्वर बोरसे हे मांडणार आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट २०२६ रोजी होत आहे.
सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी (POLICE INSPECTOR HEMANT CHAUDHARI) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजानन बास्टेवाड (POLICE SUB INSPECTOR GAJANAN BASTEWAD) यांनी करुन घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.
फिर्यादी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे उप अभियंता श्यामसुंदर प्रल्हादराव टेंभरे (वय ५३, आर्णी ह. मु. रा. कोल्हे ले आऊट, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून पारवा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल देवानंद बन्सोड यांनी सदरचा गुन्हा कायम केला आहे. या मुळे निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी संघर्ष समिती व इतर गावातील संशयित आरोपी मध्ये खळबळ माजली होती.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उप अभियंता निम्न पैनगंगा प्रकल्प विभाग, आर्णी श्यामसुंदर टेंभरे व इतर अधिकारी हे खडका येथील निम्न पैनगंगा प्रकल्प स्थळी कामानिमित्त उपस्थित होते. सदर प्रकल्पाचे काम सुरू असतांना धरण विरोधी संघर्ष समितीचे लोक तेथे आले. विरोधाचा भाग म्हणून शनिवारी (२९ नोव्हेंबर २०२५) निम्न पैनगंगा प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद पाडण्याकरिता वरील संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून, दहशत निर्माण करुन, लोकसेवक कायदेशीर काम करित असतांना बळाचा वापर करून, शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामावरील वाहन व कार्यालयावर दगडफेक करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. तसेच बळजबरीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले, अशी फिर्याद निम्न पैनगंगा प्रकल्पाचे उप अभियंता श्यामसुंदर टेंभरे (आर्णी) यांच्या लेखी तक्रारीवरून ५३ संशयित आरोपी विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे पारवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.
संशयित आरोपींचे नांव असे:
विजय राऊत (वय ५२, रा. वरुड तुकाराम), प्रल्हाद जगताप (वय ७०, रा. दातोडी), प्रल्हाद गावंडे ( ५८, रा. उमरी कापेश्वर), मुबारक तंवर (वय ५०, रा. सावळी सदोबा), भास्कर जगताप (४८, रा. दातोडी), डॉ. बाबा डाखोरे (वय ६०, रा. गोकुळ गोंडेगांव), गजानन डाखोरे (५१, रा. मदनापूर), संदीप उर्फ बंटी जोमडे (४०, रा. रामपूर), प्रविण भगत (वय ४०, रा. झापरवाडी), रामेश्वर पेंदोर (वय ३४, रा. झापरवाडी), दिपक पेंदोर (४०, रा. झापरवाडी), अंकुश मेश्राम (वय ४०, रा. झापरवाडी), मिथुन मडावी (३५, रा. झापरवाडी), सोमेश्वर गेडाम (वय ४०, रा. झापरवाडी), कैलास मंगाम (४२, रा. झापरवाडी), पंकज पवार (वय ३०, रा. झापरवाडी), माधव उईके (वय ३५, रा. झापरवाडी), सुनील पुसणाके (वय ३५, रा. झापरवाडी), विकास ठाकरे (वय ४५, रा. दातोडी), अमोल खडसे (३५, रा. आयता), जयकुमार जगताप (वय ३०, रा. दातोडी), योगेश जगताप (वय ३५, रा. दातोडी), भुवन मुनेश्वर (वय ३०, रा. पळशी), नितीन मडावी (वय ३५, रा. उमरी), सतीश नागोसे (वय ४०, रा. उमरी), सिताराम वगारहांडे (वय ३४, रा. उमरी), राजेंद्र नागोसे (सावळी सदोबा), मंगेश देशमुख (वय ३५, रा. कापेश्वर), अजय नेमाडे (वय ३६, रा.कापेश्वर), विक्की चोरे (वय २७, रा. कापेश्वर), प्रविण नकाते (वय ३५, रा. कवठा), राजू भोयर ( ३९, रा. कवठा), दत्ता ठाकरे (वय ४५, रा. कवठा), शामराव गावंडे (वय ६०, रा. कवठा), सुरेश मडावी (४०, रा. उमरी), गोपाल खोडे (वय ४५, रा. गुडा), विजय खोडे (वय ४५, रा. गुडा), नाना खोडे (वय ३५, रा. गुडा), अतुल वानखडे (वय ४६, रा. उमरी), सतीश जगताप (वय ४५, रा. पाथरी), ज्योतीराम मंडलवार (३०, रा. पाथरी), श्रावण पुसणाके (वय ३२, रा. चिमटा), सुरेश बोंतावार (४८, रा. दहेली), मंजीता शिंदे (४०, रा. आयता), बंडू नाईक (६०, रा. चिचखेड), विष्णू जगताप (वय ५५, रा. दातोडी), गुलाब मेश्राम (४५, रा. रामपूर), बंडू जगताप (रा. पाथरी), दादाराव खाती (रा. दातोडी), जयराम मिश्रा (रा. सायफळ), दिपक देशमुख (रा. कापेश्वर), अजय काकडे (३५, रा. उमरी) व सुप्रीया गावंडे (४५, रा. वाई बाजार) आदीं विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे नितीन मडावी, रवि भोगांडे व बंडू राठोडसह ४ संशयित आरोपीचे नांव एफ.आय.आर. मध्ये दुबार लिहण्यात आले होते, अशी माहिती मिळते आहे.
धरण विरोधी सन्घर्ष समीती, सावळी सदोबा व इतर गावक-याविरुद्ध घाटन्जी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याने सन्शयीत आरोपी मध्ये खळबळ माजली आहे.














