पुणे जिल्ह्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर!


पुणे जिल्ह्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर! हवामान विभागाच्या ‘रेड अलर्ट’ पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पोलीसनामा पुणे : (दीपक धूवे)

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Thunder and lightning in Pune) ‘रेड अलर्ट’ जारी केल्यामुळे, सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या, सोमवार दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, पुणे जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी देखील आवश्यक दक्षता बाळगावी आणि अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या शाळांना राहणार सुट्टी:

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (ज्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आश्रमशाळा, अनुदानित व विनाअनुदानित खाजगी शाळा, इंग्लिश मीडियमच्या शाळा आणि सर्व अंगणवाड्यांचा समावेश आहे) ६ जुलै २०२६ रोजी बंद राहतील.

शिक्षकांसाठी महत्वाच्या सूचना:

शाळांना सुट्टी असली तरी, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे त्यांना आवश्यक राहील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!