अमरावती मध्यवर्ती कारागृहात भीमगीतांचा निनाद; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बंदीजनांसाठी ‘गीतगुंजन’चा कार्यक्रम


अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन (मनिष गुडधे) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी भीमगीतांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘गीतगुंजन परिवार’ या अशासकीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या स्वराभिषेकाने कारागृह परिसर भीममय झाला होता.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, आणि कारागृह उपमहानिरीक्षक (पूर्व विभाग, नागपूर) वैभव आगे, यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात आला. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १४ एप्रिल) सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बुद्धवंदना आणि भीमगीतांचा कार्यक्रम कारागृहातील मंडल विभाग, महिला विभाग आणि न्यायाधीन विभाग येथे बंदीजनांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. यावेळी सामूहिक बुद्धवंदनेचे गायन करण्यात आले. बंदीजनांचे मनोरंजन व्हावे आणि डॉ. बाबा साहेबांचे कार्य संगीताच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने ‘गीतगुंजन परिवार’ संस्थेने विविध भीमगीते सादर केली.

यावेळी ‘लाल दिव्याचे गाडीला’, ‘माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावल रमानं’, ‘झेंडा भीमाचा निळा’, ‘भीमराजकी बेटी’ आणि ‘कसा शोभला असता नोटावर’ अशा लोकप्रिय गीतांनी बंदीजनांची मने जिंकली.

समता आणि बंधुतेची शिकवण आचरणात आणा – अधीक्षक किर्ती चिंतामणी याप्रसंगी मार्गदर्शन करताना अधीक्षक श्रीमती किर्ती चिंतामणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे महत्त्व अधोरेखित केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दिलेली समता, न्याय आणि बंधुता ही शिकवण प्रत्येकाने आपल्या आचरणात आणली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी बंदीजनांना केले. या कार्यक्रमाला १६० पुरुष आणि २४ महिला बंदी उपस्थित होते.

अधिकारी आणि कलाकारांचा सहभाग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी केले, तसेच त्यांनी ‘लाल दिव्याचे गाडीला’ हे गीतही सादर केले. गीतगुंजन परिवाराच्या अध्यक्षा सुचेता खुळे यांच्यासह सुरेश उघडे, श्रीराम रोकडे, सुमीत कोकाटे, पळसपगार, चेतन वाठोकार, आशा शेट्टी, अलका रोकडे आणि रजनी मनवर यांनी गायन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपअधीक्षक प्रदिप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी धनसिंग कवाळे, मंडल तुरुंगाधिकारी ज्योती आठवले, शिक्षक संजय घोलप, प्रवीण धर्माळे आणि सुभेदार गोपाल कचरे, श्रीकृष्ण लांजेवार, यादव कातोरे यांच्यासह कारागृह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!