फिनिक्स प्राईड सोसायटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; ‘पोलीसनामा’चे उपसंपादक अजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती


छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुकुंदवाडी परिसरातील फिनिक्स प्राईड सोसायटी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात

आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला ‘पोलीसनामा’ वृत्तपत्राचे उपसंपादक अजय भटकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यावेळी बोलताना अजय भटकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली.

सोसायटीतील नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी रहिवाशांचे कौतुक केले.

याप्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भीमगीतांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!