कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धाडसामुळे ९/११ सारख्या संभाव्य भीषण अपघाताचा धोका टळला. संपूर्ण देशाकडून कौतुकाचा वर्षाव!
मुंबई पोलीसनामा (दीपक धुवे) – अत्यंत बिकट आणि जीवघेण्या परिस्थितीत दाखवलेले अतुलनीय धैर्य, प्रसंगावधान आणि शौर्य याच्या जोरावर भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांनी एक मोठा संभाव्य भीषण अपघात आणि जीवितहानी टळली आहे. त्यांच्या या धाडसाची दखल केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात असून सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अमेरिकेतील ९/११ सारख्या भीषण हल्ल्याशी तुलना
या घटनेनंतर राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, जर हल्लेखोर सहपायलटने कॉकपिटवर पूर्णपणे ताबा मिळवला असता, तर परिस्थिती अत्यंत भयावह आणि गंभीर बनली असती. विमानावर पूर्ण नियंत्रण मिळवून ते भलत्याच दिशेने नेण्याचा आणि मोठी जीवितहानी घडवून आणण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर काहींनी या प्रसंगाची तुलना ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याशी केली आहे.
जरी हे विमान कुठे आदळू शकले असते किंवा किती नुकसान झाले असते, यावर निश्चित निष्कर्ष काढणे कठीण असले, तरी कॅप्टन स्मित मच्छर यांच्या समयसूचकतेमुळेच हा अघटित प्रकार टळला, ही गोष्ट आता निर्विवादपणे सिद्ध झाली आहे.
जीव धोक्यात घालून कॉकपिटचा दरवाजा उघडला
गंभीर आणि तणावपूर्ण परिस्थितीतही कॅप्टन स्मित मच्छर यांनी धीर सोडला नाही. त्यांनी हल्लेखोराला जोरदार प्रतिकार केला आणि अत्यंत कौशल्याने कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. कॉकपिटचा दरवाजा उघडल्यामुळेच विमानातील इतर कर्मचारी आणि प्रवाशांना वेळीच आत हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली.
प्रवाशांनीही दाखवले प्रसंगावधान
कॅप्टन यांनी दाखवलेल्या धाडसानंतर विमानातील प्रवाशांनी आणि केबिन क्रू सदस्यांनी अजिबात न घाबरता तात्काळ मदतीला धाव घेतली. सर्वांनी मिळून परिस्थितीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आणि विमानातील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले.
कॅप्टन स्मित मच्छर यांनी संकटाच्या अत्यंत कठीण क्षणी दाखवलेले हे असामान्य धैर्य संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. ‘पोलिसनामा’ परिवाराकडून कॅप्टन स्मित मच्छर तसेच संकटाच्या क्षणी धैर्याने मदतीला धावून आलेल्या सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक सलाम!















