​देवळीच्या चित्रा जावंधिया यांना ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ किताब; वास्तुशास्त्र क्षेत्रातील कार्याचा गौरव


देवळी/वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – वास्तुशास्त्र क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या चित्रा जावंधिया यांना मानाच्या ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ (Icon of Central India) या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतून निवड करण्यात येत असताना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

डॉ. रिचा जैन यांच्या वतीने आयोजित ‘महिला कर्तृत्ववान पुरस्कार’ सोहळ्यात ‘स्पिरिच्युअल लीडरशिप’ या विभागात जावंधिया यांना हा गौरव प्राप्त झाला. वास्तुशास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल आयोजकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

विना तोडफोड वास्तुशास्त्रात विशेष ओळख

 

चित्रा जावंधिया या वैदिक वास्तुशास्त्रात कार्यरत असून, कोणत्याही प्रकारची मोठी ‘तोडफोड’ न करता वास्तु उपाय आणि कलर थेरपीच्या माध्यमातून सकारात्मक बदल सुचवतात. निवासी तसेच व्यावसायिक ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने बदल घडवून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. याशिवाय त्या ‘सायंटिफिक लोगो डिझायनर’ आणि ‘सिग्नेचर रीडर’ म्हणूनही ओळखल्या जातात.

पुरस्कारांची मालिका

जावंधिया यांच्या कार्याचा यापूर्वीही अनेकदा गौरव झाला आहे.

२०२४ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘वास्तु एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान.

२०२५ : ‘नवभारत एम्पॉवर वुमन’ पुरस्काराने सन्मानित.

एप्रिल २०२६ : विधान भवन येथे आयोजित ‘अधिकार’ मंचाच्या कार्यक्रमात ‘गेस्ट स्पीकर’ म्हणून निमंत्रित.

सामाजिक क्षेत्रातही सक्रिय

व्यावसायिक कार्यासोबतच त्या सामाजिक क्षेत्रातही हिरीरीने भाग घेतात. सध्या त्या वर्धा जिल्हा माहेश्वरी समाजाच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे चित्रा जावंधिया यांनी सेंट्रल इंडियात वर्धा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!