ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचीही चर्चा; नागरिकांमध्ये मतमतांतरे
पुणे : लोकप्रिय रियालिटी शो Bigg Boss Marathi मधील स्पर्धक Divya Shinde हिला शोमधून बाहेर काढण्यात आल्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. शोच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता या वादाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. काही ठिकाणी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा असून त्यावरून सामान्य नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शोमध्ये झालेल्या वादानंतर निर्मात्यांनी नियम व करार (कॉन्ट्रॅक्ट) यांचा आधार घेत दिव्या शिंदे हिला स्पर्धेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. रियालिटी शोमध्ये सहभागी होताना स्पर्धकांकडून आधीच सर्व नियम आणि अटी मान्य करून घेतल्या जातात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकांकडून कारवाई होणे ही करारानुसार असलेली प्रक्रिया असल्याचे काहींचे मत आहे.
मात्र या निर्णयानंतर सोशल मीडियावर आणि विविध स्तरांवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहीजणांचा आरोप आहे की, या प्रकरणाला अनावश्यकपणे जातीय वळण दिले जात आहे. काही सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया देताना असा सवाल उपस्थित केला आहे की, “मनोरंजनाच्या कार्यक्रमातील निर्णयावरून जातीय मुद्दे पुढे आणणे योग्य आहे का?”
काही नागरिकांचे म्हणणे आहे की, ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर कायद्याचा वापर हा खऱ्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात यायला हवा. मात्र जर प्रत्येक वादात अशा कायद्याचा वापर किंवा त्याचा उल्लेख केला जाऊ लागला, तर त्यातून समाजात गोंधळ निर्माण होऊ शकतो.”
तर काही नागरिकांनी चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, “प्रत्येक छोट्या वादाला जातीय रंग देऊन ॲट्रॉसिटी मुद्दा पुढे आणला गेला, तर भविष्यात अशा कायद्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळे अशा विषयांमध्ये संयम आणि जबाबदारीने भूमिका घेणे आवश्यक आहे.”
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकजण आपापली मते व्यक्त करत आहेत. काही जण निर्मात्यांच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काही जण दिव्या शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत.
एकूणच, मनोरंजन क्षेत्रातील एका वादातून आता समाजात व्यापक चर्चा निर्माण झाली असून या प्रकरणाला पुढे नेमके कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैयक्तिक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार होत असल्याची भावना समाजातील एका वर्गात व्यक्त होत आहे. आपल्याला पुढे कसलं वळण घेतात हे बघावं लागेल.
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे आहे सर्व महाराष्ट्रामध्ये जातीभेद नसला पाहिजे. प्रत्येक वेळेस महापुरुषांना पुढे करून अन्य आणि प्रकरणाला वेगळे वळण देणे हे नक्कीच थांबले पाहिजे यात काही मतभेद नसावेत.














