बिलायता रेती घाटावर उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे यांची धडक कारवाई; पोकलँडसह ट्रॅक्टर जप्त


मोठी बातमी : बिलायता रेती घाटावर उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे यांची धडक कारवाई; पोकलँडसह ट्रॅक्टर जप्त

घाटंजी : पोलीसनामा ऑनलाइन (अयनुद्दीन सोलन्की) – घाटंजी तालुक्यातील अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर प्रशासनाने आपला मोर्चा वळवला आहे. नवनिर्वाचित सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी ११ मे २०२६ रोजी रात्री बिलायता येथील रेती घाटावर अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध उत्खनन करणारे एक पोकलँड मशीन आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून, रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

रात्रीच्या सुमारास अचानक छापा

मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी महसूल पथकासह सोमवारी रात्री मौजा बिलायता येथील रेती घाटाला अचानक भेट दिली. या पाहणी दरम्यान घाटावर अवैधपणे रेती उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. एक पोकलँड मशीन आणि रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला.

वाहने तहसील कार्यालयात जमा

SDM डोंगरे यांच्या आदेशानुसार महसूल पथकाने दोन्ही वाहने तात्काळ जप्त केली असून ती घाटंजी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. या वाहनांवर महसूल विभागामार्फत नियमानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

संयुक्त पथकाची कामगिरी

या धडक कारवाईवेळी घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी, बिलायता येथील तलाठी तसेच महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. महसूल आणि पोलीस विभागाच्या या संयुक्त कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

रेती माफियांना कडक इशारा

“अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीबाबत प्रशासनाचे धोरण शून्य सहिष्णुतेचे (Zero Tolerance) राहील. कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नाही आणि प्रशासनाची कठोर नजर कायम राहील,” असा स्पष्ट इशारा सहाय्यक जिल्हाधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी दिला आहे. तसेच महसूल आणि पोलीस विभागाने समन्वय ठेवून अशा कारवाया अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

​या कारवाईमुळे घाटंजी तालुक्यातील खडका, ताडसावळी, सायफळ, राजापेठ, नारायणपेठ, शरद आणि बिलायता या परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे मोठे रॅकेट धास्तावले आहे.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!