​मोठी बातमी: घाटंजीचे ठाणेदार केशव ठाकरेंची बदनामी भोवणार; ८ जणांना ८० लाखांच्या अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस


मोठी बातमी: घाटंजीचे ठाणेदार केशव ठाकरेंची बदनामी भोवणार; ८ जणांना ८० लाखांच्या अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस

घाटंजी : पोलीसनामा ऑनलाइन (अयनुद्दीन सोलन्की) – घाटंजी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशव भीमराव ठाकरे यांची राजकीय वैमनस्यातून बदनामी करणे आणि त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणे, संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे. ठाणेदार ठाकरे यांच्या वतीने ॲड. जी. आय. धात्रक आणि ॲड. वैभव महाजन यांनी एकूण ८ जणांसह संबंधित वृत्तपत्रांना ८० लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.

नेमके प्रकरण काय?

नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल आणि २ मे २०२६ रोजी ठाणेदार केशव ठाकरे यांच्या विरोधात आर्णी पोलीस स्टेशनला काही व्यक्तींनी खोटे व बनावट रिपोर्ट दिले होते. ज्या घटनेचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला, त्या वेळी ठाणेदार ठाकरे हे घटनास्थळी हजरच नव्हते. केवळ सूडबुद्धीने आणि पोलीस खात्यातील त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हा बनाव रचण्यात आला असल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

एकतर्फी वृत्तांकनावर आक्षेप

या खोट्या तक्रारींच्या आधारे काही वृत्तपत्रांनी ४ मे २०२६ रोजी ठाणेदार ठाकरे यांची बाजू जाणून न घेता एकतर्फी बातम्या प्रसिद्ध केल्या. पत्रकारितेच्या नियमांचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक ही बदनामी करण्यात आल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे ठाकरे यांची समाजात आणि पोलीस विभागात मोठी मानहानी झाली आहे.

कायदेशीर मागण्या आणि इशारा:

ॲड. गणेश धात्रक आणि ॲड. वैभव महाजन यांनी नोटीसद्वारे खालील इशारा दिला आहे:

लेखी माफीनामा : संबंधित वृत्तपत्रांनी ७ दिवसांच्या आत लेखी माफीनामा प्रसिद्ध करावा.

चूक मान्य करणे : खोटे रिपोर्ट देणाऱ्यांनी आपली चूक मान्य करून जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्याबाबत लेखी कळवावे.

जर ७ दिवसांत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६ (१), (२), (३) व (४) अन्वये फौजदारी कारवाई आणि ८० लाख रुपयांचा दिवाणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल.

PTI कडे तक्रार आणि मान्यता रद्द करण्याची मागणी

या प्रकरणाची अधिकृत तक्रार प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) यांच्याकडेही करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वृत्तपत्रांची मान्यता रद्द करण्याची मागणीही ठाणेदार ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे घाटंजी आणि आर्णी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!