अमरावती च्या हबीब नगर मध्ये घरामधून सुरू होत एमडी ड्रग्स चा कारोबार ८.१५ लाखाच्या एमडी सोबत आरोपी पोलिसांच्या अटकेत 


अमरावती च्या हबीब नगर मध्ये घरामधून सुरू होत एमडी ड्रग्स चा कारोबार ८.१५ लाखाच्या एमडी सोबत आरोपी पोलिसांच्या अटकेत

पोलीसनामा आदेश पाठक – अमरावती

अमरावती शहर च्या नागपुरी गेट पोलिस स्टेशन परिसरात हबीब नगर क्रमांक.१ मध्ये अपराध शाखा च्या टीम नी फार मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स तस्करी करणाऱ्यांचा फंडाफोड झालं. पोलिसांनी छापेमारी करून तब्बल ५४.२ ग्राम एमडी ड्रग्स आणि इलेक्ट्रॉन काट्या सोबत ८ लाख १५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एक आरोपी अब्दुल इजाज अब्दुल अजीम उर्फ इजाज चंद्रपुरी (वय ५५ वर्ष राहणार हबीब नगर क्रमांक १) हा पोलिसांच्या ताब्यात आहे . पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की आरोपी स्वतःच्या घरून एमडी ड्रग्स ची विक्री करतो. या सूचनेच्या आधारावर अपराध शाखा युनिट १ ने आरोपी च्या घरावर छापा टाकला. पोलिसांच्या तपासा दरम्यान सदर आरोपीच्या घरामधून ५४.२ एमडी ड्रग्स सोबत २ हजार रुपयाचा इलेक्ट्रिक काटा तसेच ८ लाख १५ हजार रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी सुरू असताना आरोपींनी हा सर्व माल स्वतः चा असल्याची कबुली दिली.

मात्र पोलिसांचा यावर तपास सुरू असून आरोपीने हा मुद्देमाल कोठून आणि कोणाकडून आणला असावा . याची विक्री हा कोणाला करतो आहे याचा तपास सध्या पोलिस करत आहे. या वेळी उपस्थित पोलिस आयुक्त राकेश ओला, उप आयुक्त यशवंत सोळंके आणि रमेश धुमाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे , कैलास पुंडरकर, च्या मार्गदर्शनाने अपराध शाखा युनिट १ चे पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे तसेच कारवाई दरम्यान असणारे पोलिस अधिकारी अतुल वर , मनीष वाकोडे , गजानन सोनुने, फिरोज खान, सतीश देशमुख, मंगेश लोखंडे, निजामुद्दीन सयद , उपस्थित होते.


25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!