मुंबईत साहित्य, कला आणि समाजसेवेचा ‘दिनकर सन्मान’ सोहळा दिमाखात संपन्न; दिग्गज मान्यवरांचा गौरव


मुंबईत साहित्य, कला आणि समाजसेवेचा ‘दिनकर सन्मान’ सोहळा दिमाखात संपन्न; दिग्गज मान्यवरांचा गौरव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (गुरुदत्त वाकदेकर) – साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करणारा भव्य ‘दिनकर सन्मान’ पुरस्कार सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कविसंमेलन, अभिवाचन आणि भीमगीत प्रकाशनाने रंगत आणली.

कार्यक्रमाचे आयोजक आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या दशकभराच्या सांस्कृतिक प्रवासाचा आढावा घेतला. मराठी भाषा आणि साहित्यासाठी अविरत कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मान्यवरांची मांदियाळी

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गायक नंदेश विठ्ठल उमप, साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, ज्येष्ठ लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड आणि दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत उपस्थित होते.

नंदेश उमप : “लोककला आणि साहित्य जोपासणाऱ्या संस्था नव्या पिढीला प्रेरणा देतात.”

डॉ. मीनाक्षी पाटील : “नवोदितांना व्यासपीठ देणे ही मोठी सांस्कृतिक सेवा आहे.”

डॉ. हेमंतराजे गायकवाड : “भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.”

विविध पुरस्कारांचे वितरण

कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील दिग्गजांना ‘दिनकर सन्मान’ देऊन गौरविण्यात आले:

पत्रकारिता : प्रकाश सावंत (संपादक, दैनिक नवशक्ती) आणि राजेंद्र मांडवकर (संपादक, गुहागर सत्ता) यांना ‘दिनकर पत्रकारिता गौरव सन्मान’.

साहित्य : डॉ. स्मिता निखिल दातार (‘एक होती हिडिंबा’ कादंबरी), डॉ. मानसी पाटील (‘मनगाभारा’ काव्यसंग्रह), डॉ. योगेश जोशी (‘वंद्य वंदे मातरम्’ माहितीग्रंथ) आणि राहुल मुंढे (वारकरी प्रकाशन).

क्रीडा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चेसबॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्नेहा वायकर यांना ‘दिनकर खेलरत्न सन्मान’.

कला व रंगभूमी : प्रा. अरविंद निगळे (रंगकर्मी सन्मान) आणि समीर करंगुटकर (कला गौरव).

समाजसेवा : स्वामी संस्था (रुग्ण सेवा), तितिक्षा इंटरनॅशनल, मैत्री संस्था आणि संजीवनी सेवाभावी संस्था.

सांस्कृतिक मेजवानी

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विलास सूर्यवंशी लिखित भीमगीताचे प्रकाशन. तसेच, आयोजित कविसंमेलनात ज्योती राखुंडे, विवेक जोशी, सीमा खान शेख यांच्यासह अनेक कवींनी आपल्या रचना सादर केल्या. अदिती नैराळे, मीनल कांबळे यांनी प्रभावी अभिवाचन केले. नमिता आफळे यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.

या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. साहित्य आणि कलेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या सोहळ्याने उपस्थित रसिकांची मने जिंकली.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!