ऑटो चालविण्याच्या वादातून लाकडी दांड्याने मारहाण; यवतमाळ न्यायालयाकडून आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा


घाटंजी : ऑटो चालविण्याच्या वादातून लाकडी दांड्याने मारहाण; यवतमाळ न्यायालयाकडून आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

घाटंजी : पोलीसनामा ऑनलाईन (अयनुद्दीन सोलंकी) –

घाटंजी तालुक्यातील खापरी येथील ऑटो पॉईंटवर ऑटो चालविण्याच्या किरकोळ वादावरून एका चालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला यवतमाळच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

हरिभाऊ उर्फ नरसिंग कणाके असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या निकालामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कडक संदेश गेला आहे.

नेमकी घटना काय होती?

२१ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास खापरी येथील ऑटो पॉईंट जवळ हा प्रकार घडला होता. जखमी राजेश प्रभाकर मराठे आणि आरोपी हरिभाऊ कणाके यांच्यात ऑटो चालविण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका पेटला की, आरोपी हरिभाऊ याने राजेश मराठे यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जोराचा प्रहार केला आणि अंगावर ठिकठिकाणी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले होते.

घाटंजी पोलिसांचा तपास आणि ५ साक्षीदार

या घटनेनंतर घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र (Charge Sheet) सादर केले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ५ महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले.

न्यायालयाने जखमी साक्षीदार राजेश मराठे, प्रत्यक्षदर्शी उमेश मराठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. तिवारी आणि तपास अधिकारी पोउनि शशिकांत नागरगोजे यांची साक्ष तसेच वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीला भादवि (IPC) कलम ३३५ अंतर्गत दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद यशस्वी

या खटल्यात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील तथा अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. विजय एस. तेलंग यांनी उत्कृष्ट युक्तिवाद करून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून घाटंजी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार सारिका बोधनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. न्यायालयाच्या या निकालानंतर पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

 


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!