​सोमेश्वर पॅटर्नचा धमाका! ‘विवेकानंद अभ्यासिके’चे २२ शिलेदार आता पोलीस दलात; पुणे शहर पोलीस भरतीत घवघवीत यश


गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण तरुणांची गरुडझेप; दोन सख्ख्या बहिणींसह दोन माजी सैनिकांचीही पहिल्याच प्रयत्नात बाजी!

पोलीसनामा ऑनलाईन ( दीपक धुवे ) पुणे विभाग  सोमेश्वरनगर

पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत सोमेश्वरनगर परिसरातील ‘विवेकानंद अभ्यासिके’ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या अभ्यासिकेतून तब्बल २२ मुला-मुलींची पोलीस दलात निवड झाली असून, सोमेश्वर पॅटर्नची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. एकाच अभ्यासिकेतून इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारांची निवड झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

खाकी वर्दीचे स्वप्न साकार

पुणे शहर पोलीस दलातील १७३३ जागांसाठी ही मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बळावर आपले पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक मुलांनी अवघ्या १९ ते २० व्या वर्षीच पोलीस दलात स्थान मिळवले आहे.

दोन सख्ख्या बहिणी आणि माजी सैनिकांचे यश

या यशात दोन सख्ख्या बहिणींनी एकत्रित यश मिळवत कुटुंबाची मान उंचावली आहे. तसेच, दोन माजी सैनिकांनी देखील आपल्या पहिल्याच प्रयत्नात पोलीस दलात स्थान मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

अभ्यासिकेचे ‘हे’ आहेत यशस्वी शिलेदार:

सागर माने (१३७), सचिन निमगिरे (१३६), सिद्धेश पवार (१३४), विशाल कोकरे (१३४), अभी लाळगे (१३२), अक्षय सापटे (१३२), सोमनाथ निकम (१३१), स्वप्नील जाधव (१२९), प्रज्वल जगताप (१२६), मयूर गिते (१२२), भीमा मदने (१२०), पोपट पाटोळे (११७), किरण लकडे (११३), रामदास दुबे (१११) या मुलांसह कीर्ती गायकवाड (१३१), निकिता सोडमिसे (१२८), ऋतुजा कोकरे (१२७), निकिता मारकड (१२५), समीक्षा होळकर (१२५), साक्षी शेंडकर (१२४), प्राजक्ता बोडरे (१२४) आणि मिताली सोडमिसे (१२०) या मुलींचा यशस्वी उमेदवारांमध्ये समावेश आहे.

ग्रामीण तरुणांसाठी आशेचा किरण

ग्रामीण भागातील पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी विवेकानंद अभ्यासिकेचा हा ‘सोमेश्वर पॅटर्न’ आता आशेचा किरण ठरला आहे. एकाच ठिकाणाहून इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याने पंचक्रोशीतून आनंद व्यक्त केला जात असून, आगामी काळातील भरती प्रक्रियांसाठी ग्रामीण तरुणांचा आत्मविश्वास या निकालामुळे अधिक वाढला आहे.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!