प्रशासकीय फेरबदल : उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या तडकाफडकी बदल्या; ९ जूनपर्यंत रुजू होण्याचे आदेश
घाटंजी : पोलीसनामा ऑनलाईन (अयनुद्दीन सोलंकी) – उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या आदेशानुसार राज्याच्या न्यायिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील अनेक प्रमुख न्यायाधीशांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल स्वप्नील खटी यांनी या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले असून, बदली झालेल्या सर्व न्यायाधीशांना येत्या ९ जून २०२६ पर्यंत आपापल्या नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
यवतमाळ जिल्हा आणि इतर भागांतून बदलून गेलेल्या व रुजू झालेल्या न्यायाधीशांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:
यवतमाळ जिल्ह्यातून बदलून गेलेले न्यायाधीश:
१) न्यायाधीश आर. आय. सोनवणे : यवतमाळ येथून त्यांची बदली लेबर कोर्ट, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे करण्यात आली आहे.
२) न्यायाधीश के. के. माने : केळापूर येथील न्यायाधीश के. के. माने यांची बदली प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) म्हणून मुंबई येथे झाली आहे.
३) न्यायाधीश श्रीमती ई. व्ही. धांडे : यवतमाळ येथून त्यांची बदली स्मॉल कॉज कोर्ट, मुंबई (Small Causes Court) येथे करण्यात आली आहे.
४) न्यायाधीश एम. डी. जोशी : यवतमाळ येथून त्यांची बदली अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (ACJM) म्हणून अहमदनगर येथे झाली आहे.
५) न्यायाधीश श्रीमती आर. डी. पतंगे : यवतमाळ येथून त्यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून कोल्हापूर येथे रवानगी करण्यात आली आहे.
६) न्यायाधीश ए. आर. मोहणे : यवतमाळ येथून त्यांची बदली अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून वसई (ठाणे) येथे एस. बी. वाळके यांच्या जागेवर करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात नवे रुजू झालेले न्यायाधीश:
१) न्यायाधीश डी. ए. तिवारी : चंद्रपूरवरून बदली होऊन ते आता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून यवतमाळ येथे रुजू होणार आहेत.
२) न्यायाधीश श्रीमती सी. आर. उमरेडकर : दारव्हा येथून त्यांचे स्थानांतरण अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून यवतमाळ न्यायालयात करण्यात आले आहे.
३) न्यायाधीश के. एम. पत्रे : भुसावळ (जळगाव) येथून बदलून आलेले न्यायाधीश के. एम. पत्रे यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून यवतमाळ येथे श्रीमती ई. व्ही. धांडे यांच्या रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या या धडक प्रशासकीय फेरबदलामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या विधी व न्यायालयीन वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, नवीन न्यायाधीश ९ जूनपूर्वी आपापला पदभार स्वीकारणार आहेत.















