पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न; देश-विदेशातील दिग्गजांचा गौरव, न्यायमूर्ती कटके यांची प्रमुख उपस्थिती


पुणे : पोलीसनामा ऑनलाइन ( गुरुदत्त वाकदेकर) – आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुण्यात अत्यंत उत्साही आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले.

डेक्कन येथील हॉटेल ग्रीन सिग्नलच्या नीलमल हॉलमध्ये आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती कटके होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश नेऊरगावकर यांची सहकुटुंब उपस्थिती होती.

मान्यवरांचा विशेष सत्कार या सोहळ्यात वनराई संस्थेचे सचिव अमित (रवींद्र धारिया यांच्या वतीने), सुप्रसिद्ध कवी विजयराव सातपुते, लेखक व पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, व्यंगचित्रकार नीरज सबनीस आणि नवीन आश्वासक नेतृत्व पूजा प्रतुल जागडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक आणि सर्जनशील कार्याचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

प्रेरणा आणि सांस्कृतिक मेजवानी आत्मसिद्ध मिशनचे प्रमुख राजेशजी यांनी आपल्या प्रभावी संवादातून उपस्थितांना सकारात्मकता आणि आत्मविकासाचा संदेश दिला. कार्यक्रमात चारुता आपटे यांच्या सुमधुर गायनाने विशेष रंगत आणली. मराठी गुरु वाय. पी. बाबा यांच्या प्रेरणेतून साकारलेला हा सोहळा व्यक्तिमत्त्व विकासाचा उत्सव ठरला.

प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रा. संजय पवार, समाजकल्याण अधिकारी शिरसाट साहेब, सिनेअभिनेत्री नंदिनी, राष्ट्रीय पिस्तूल चॅम्पियन प्रथमेश गायकवाड, खाद्य संस्कृती तज्ज्ञ मानसी भोसले, प्रा. डॉ. प्रियांका जोशी, सुयोग कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नेटके नियोजन तपेंद्र, गजानन, समता आणि सोनाली यांनी केले. पुणेकरांसाठी हा सोहळा ऊर्जा आणि प्रेरणेचा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!