अमरावती: साक्षरा पॅराडाईज इंग्लिश हायस्कूलची स्वरांगी मालोकार दहावीत चमकली; मिळवले ९७.२० टक्के गुण
अमरावती (पोलीसनामा प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती येथील साक्षरा पॅराडाईज इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरांगी किशोर मालोकार हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिने या परीक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवून शाळेच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे.
मेहनत आणि आत्मविश्वासाचे फळ
स्वरांगीने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभ्यासातील सातत्य, कठोर मेहनत आणि स्वतःवर असलेल्या विश्वासामुळेच हे उज्ज्वल यश संपादन करता आले असल्याचे स्वरांगीने सांगितले. तिच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
स्वरांगीच्या या यशाबद्दल तिचे शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिचे वडील किशोर भगवानराव मालोकार, आई कविता मालोकार, भाऊ व्यंकटेश तसेच आजी रंभाबाई यांनी तिचे विशेष कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
गोविंदा ग्रूप तर्फे विशेष अभिनंदन आणि आशीर्वाद .















