एसटीचा ७८ वा वर्धापन दिवस : बडनेरा बसस्थानक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजले


एसटीचा ७८ वा वर्धापन दिवस : बडनेरा बसस्थानक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजले; कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बडनेरा : पोलीसनामा ऑनलाइन (आदेश पाठक) – गेली अनेक दशके जनतेला सुरक्षित आणि सोईस्कर प्रवासाची सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) ७८ वा वर्धापन दिवस १ जून रोजी बडनेरा बसस्थानकावर अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. एसटीच्या या वाढदिवसानिमित्त बसस्थानकाचे रूप पूर्णपणे पालटले होते.

बसस्थानक झाले सजले

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त बडनेरा बसस्थानक आकर्षक हार-फुले, तोरणे आणि सुंदर रांगोळ्यांनी सजवण्यात आले होते. या उत्साही वातावरणामुळे बसस्थानकावरील चालक, वाहक, अधिकारी वर्ग आणि प्रवाशांमध्येही आनंदाचे वातावरण दिसून आले. वाढदिवसाचे औचित्य साधून अधिकाऱ्यांनी केक कापून एसटीचा ७८ वा वाढदिवस थाटात साजरा केला.

‘आपली एसटी’ जपण्याची भावना

एसटी बसच्या माध्यमातून केवळ प्रवासच नाही, तर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. यामध्ये चालक, वाहक आणि अधिकारी वर्गासोबतच बसस्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेते (हॉकर) यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असते. प्रवाशांनी एसटीच्या कार्याचे कौतुक करताना, “एसटी बसने आम्हाला वर्षानुवर्षे सुखरूप प्रवास घडवला आहे, ही बस सेवा अशीच अखंड आणि सुरळीत चालू राहावी,” अशा भावना व्यक्त केल्या.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याप्रसंगी बडनेरा आगार व्यवस्थापक देशमुख यांच्यासह अत्रे मॅडम, सधाफळे मॅडम, सोळंके मॅडम, अविका काकडे मॅडम आणि संजुभाऊ देवरे, सानप, नागदिवे, गबने, जोशी यांसारखे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच फिरता विक्री परवानाधारक शशिकांत पाठक आणि दुकानदार प्रदीप उसरे यांच्यासह अनेक कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त बडनेरा डेपोमध्ये उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत, एसटी सेवेचा गौरव केला.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!