बडनेरा येथे विनामूल्य उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा दिमाखदार समारोप; कराटे आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष


बडनेरा येथे विनामूल्य उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा दिमाखदार समारोप; कराटे आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

बडनेरा : पोलीसनामा ऑनलाईन (आदेश पाठक) –

क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती, जिल्हा ॲम्युचर स्पोर्ट कराटे डो असोसिएशन अमरावती, नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा (शारीरिक शिक्षण विभाग), राजेश्वर युनियन हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय बडनेरा आणि द फायटर स्पोर्ट क्लब अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर २०२६’ चा नुकताच अत्यंत उत्साहात समारोप झाला. सार्वजनिक कपिल बुद्धविहार येथील भव्य सभागृहात हा समारोप सोहळा संपन्न झाला.

हे शिबिर मुख्य प्रशिक्षक सेंसाई सोनल रंगारी सर यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनात, नियमितपणे सकाळी राजेश्वर युनियन हायस्कूल आणि सायंकाळी शारदानगर (नवी वस्ती, बडनेरा) येथे यशस्वीरीत्या राबविण्यात आले होते.

चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सभागृह दणाणले!

समारोपिय कार्यक्रमात शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने कराटेचे स्वसंरक्षण तंत्र, थरारक मर्दानी खेळ, लाठीकाठी, दानपट्टा, रोपेस्केपिंग आणि आत्मसंरक्षणाचे (Self Defence) विविध प्रकार कशा पद्धतीने हाताळायचे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय नगरसेवक अजयभाऊ जयस्वाल, नगरसेविका सौ. रजनीताई डोंगरे, राजेश्वर युनियन हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एन. राघोर्ते, प्रा. अमोल मिलखे, करुणा कोचिंग क्लासेसचे संचालक प्रवीण मेश्राम, ॲडव्होकेट सौ. सारिका साखरे, गजूभाऊ सावंत आणि मुख्य प्रशिक्षक सोनल रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून रोजच्या जीवनात खेळाचे आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या अंगातील कौशल्य आणि त्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून मान्यवरांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण

या शिबिरामध्ये कठोर परिश्रम घेऊन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागी छात्र-विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या वतीने अधिकृत प्रशस्तीपत्र (Certificate) देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या पाल्यांमधील हा अद्भूत बदल पाहून उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावर देखील अभिमानाचे भाव दिसून आले.

या यशस्वी उपक्रमाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. खुशाल अळसपुरे, नगरसेवक किशोरभाऊ जाधव, नगरसेविका सौ. गौरीताई शैलेश मेघवानी, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, राजेश वडते, त्रिवेणी बांते, वैशाली इंगळे, प्रणिती भिमटे, राहुल निवडुंगे, प्रफुल डांगे, महाराष्ट्र प्रेयर नेटवर्कचे डायरेक्टर प्रवीण पुंडकर, सार्वजनिक बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विलासभाऊ साखरे, शुभम मोहतुरे आणि अखिल भाई यांच्यासह अमरावती जिल्हा कराटे असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, पत्रकार बांधवांनी आणि बडनेरा शहरवासीयांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.


हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरुद्ध चालले आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरुद्ध चालले आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

error: Content is protected !!