घाटंजी पंचायत समितीचे वादग्रस्त विस्तार अधिकारी एस. जे. इसलकर प्रकरणाची १७ ऑगस्टला पुढील सुनावणी; साक्षीदारास पुन्हा समन्स जारी!


घाटंजी पंचायत समितीचे वादग्रस्त विस्तार अधिकारी एस. जे. इसलकर प्रकरणाची १७ ऑगस्टला पुढील सुनावणी; साक्षीदारास पुन्हा समन्स जारी!

घाटंजी (यवतमाळ) | पोलीसनामा (प्रतिनिधी – अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) तथा नेर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी सखाराम जयवंतराव इसलकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दाखल केलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी होणार आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी या प्रकरणी साक्षीदारास पुन्हा समन्स बजावला आहे. यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील आणि साक्षीदार अनुपस्थित राहिले होते.
नेमके काय आहे लाचखोरीचे प्रकरण?
नेर पंचायत समितीमध्ये प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना, चिकणी डोमगा येथील अंगणवाडीच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी सचिव/ग्रामसेवक गणेश सुखदे यांच्याकडे इसलकर यांनी ५,००० रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी २,००० रुपये रोख स्वीकारल्यानंतर, उर्वरित ३,००० रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’ने सापळा रचून कारवाई केली होती.
याप्रकरणी नेर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १३(१)(डी)/डब्लू आणि १३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) सादर करण्यात आले असून, हे प्रकरण सध्या न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे.

विस्तार अधिकारी इसलकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप:
ग्रामपंचायत तपासणीत वसुली: घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या तपासणीच्या नावाखाली सचिवांकडून मोठ्या प्रमाणावर रकमा उकळल्याचा आरोप जांबचे माजी सरपंच नथ्थू वेट्टी यांनी केला आहे.
कार्यालयात बसूनच खोटे अहवाल: प्रत्यक्ष कोणत्याही ग्रामपंचायतीला भेट न देता कार्यालयात बसूनच भेटींचे खोटे अहवाल तयार केल्याचा आरोप कवाडे यांनी केला आहे.
निलंबन व बदलीची मागणी: महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ व १९६७ अन्वये इसलकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच नथ्थू वेट्टी, सावंगीच्या सदस्या मीराबाई किणाके आणि युसूफ पठाण यांनी केली आहे. जनगणना कामाच्या कारणामुळे त्यांची यवतमाळला झालेली बदली तात्पुरती रद्द झाली असून, त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
इतर तीन ग्रामपंचायतींच्या चौकशीतही घोळ; गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार!

कुर्ली येथील तक्रारदार अयनुद्दीन सोलंकी यांनी घाटंजीच्या गट विकास अधिकारी (BDO) वंदना नानोटे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. शिरोली, मुरली आणि मौजा कुऱ्हाड या तीन ग्रामपंचायतींच्या चौकशी अहवालाची प्रत अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

कुऱ्हाड व मुरलीचे सचिव मंगेश व्ही. गाऊत्रे यांच्याकडून आक्षेपाधीन रक्कम वसूल करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१६(५) व ३१८(४) अन्वये फौजदारी कारवाई करण्याची मागणी सोलंकी यांनी केली आहे. पंचायत विभागाचे अधिकारीच अहवाल तयार करून गट विकास अधिकाऱ्यांसमोर सह्यांसाठी ठेवतात, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा परिषदेच्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी जोर धरत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेत आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!

लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय काय निकाल देते, याकडे यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!