दिव्यांगजनांच्या मदतीसाठी तरुणाईचा तंत्रज्ञानाविष्कार! ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६’ च्या अंतिम फेरीला मुंबईत दणक्यात सुरुवात



दिव्यांगजनांच्या मदतीसाठी तरुणाईचा तंत्रज्ञानाविष्कार! ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६’ च्या अंतिम फेरीला मुंबईत दणक्यात सुरुवात; विजेत्यांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन (गुरुदत्त वाकदेकर) – दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी तरुणाईने आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार सादर केला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६ : इनोव्हेट फॉर दिव्यांगजन’ (Solvethon 2025-26) या स्पर्धेच्या अंतिम निवड प्रक्रियेला मुंबईत कमालीच्या उत्साहात प्रारंभ झाला.

या अंतिम फेरीत कडाक्याची स्पर्धा पाहायला मिळाली असून, परीक्षकांच्या सखोल मूल्यमापनानंतर अखेर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघांची घोषणा करण्यात आली आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटकीय सोहळा

या दिमाखदार सोहळ्याला यशवंत शितोळे, कविता मुरुगकर, केतन कोठारी, पारुल कुमठा यांच्यासह शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांचे कौतुक करताना, दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुकर करण्यासाठी अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधन आणि सामाजिक दृष्टिकोनातून तयार केलेल्या प्रकल्पांची आज देशाला मोठी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

अंतिम फेरीत ‘या’ थक्क करणाऱ्या प्रकल्पांचे सादरीकरण:

अंतिम फेरीत निवड झालेल्या विविध नामांकित संस्थांच्या संघांनी दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यंत सुलभ आणि प्रभावी उपाय सुचविणारे मॉडेल्स सादर केले. यामध्ये प्रमुख आकर्षण ठरलेले प्रकल्प खालीलप्रमाणे:

  • मानव गट (पुणे) : अंध व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी ‘ब्लाइंड तिकीट सिस्टिम’ (Blind Ticket System).

  • व्हिजनर्स गट (नाशिक) : दृष्टीहीनांना रस्त्याने चालताना दिशा दाखवणारी ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’ (Smart Blind Stick).

  • प्रयास गट (पालघर) : दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार थेट रोजगार मिळवून देणारे हक्काचे डिजिटल व्यासपीठ.

  • वी कॅन गट (आंध्रप्रदेश) : दिव्यांग महिला व व्यक्तींच्या स्वसंरक्षणासाठी तयार केलेले विशेष गॅझेट/डिव्हाइस.

  • फार्मासिस्ट गट (नाशिक) : वेळेवर औषध घेण्याची आठवण करून देणारे आधुनिक ‘स्मरणयंत्र’.

  • त्रिनेत्रा गट (पुणे) : घरच्या घरी अचूक आरोग्य तपासणी करणारे ‘नाडी तपासणी यंत्र’.

  • जीओएम गट (नाशिक) : आरोग्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर देणारे ‘क्यूआरएक्स इन्फो’ (QRX Info) हेल्थकेअर ॲप.

सादर करण्यात आलेल्या या सर्वच संकल्पनांमध्ये दिव्यांगांच्या जीवनमानात आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रचंड क्षमता असल्याचे मत तज्ज्ञ परीक्षकांनी व्यक्त केले.

विजेत्यांचा भव्य गौरव सोहळा लवकरच!

अंतिम फेरीतील चुरशीच्या सादरीकरणानंतर तिन्ही विजेत्या संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी लवकरच एका विशेष आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर विभागाचे संयोजक विजय कान्हेकर, विभाग प्रमुख दीपिका शेरखाने, समन्वयक मनीषा खिल्लारे यांच्यासह राहील शेख, सूत्रसंचालक हेजल न्यायनीत, समृद्धी पुजारी, शिवम जाधव आणि संकेत जांभळे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी हा ‘सॉल्व्हथॉन’ प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे.


जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

25
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

जाना नायगन पूर्ण चित्रपट संग्रह: ‘जन नायगन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4: थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला; जगभरातील एकूण 217.48 कोटी रुपयांवर पोहोचले | तमिळ चित्रपट बातम्या

error: Content is protected !!