यवतमाळ हादरले! दुसऱ्या लग्नासाठी पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; नराधम पतीविरुद्ध गुन्हा दाखल!


यवतमाळ हादरले! दुसऱ्या लग्नासाठी पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; नराधम पतीविरुद्ध गुन्हा दाखल!

पोलीसनामा; प्रतिनिधी अजय उप्पलवार

तालुक्यातील मेंढला येथे दुसऱ्या लग्नात अडसर ठरत असलेल्या पत्नीला जिवंत पेटवून ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यवतमाळ तालुक्यातील मेंढला येथे दुसऱ्या लग्नात अडसर ठरत असलेल्या पत्नीला जिवंत पेटवून ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री उघडकीस आली. आरोपी पतीविरुद्ध पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चैताली उर्फ आईशा जुबेर सिद्दीकी (३५ रा. मेंढला) असे जखमी महिलेचे नाव आहे. तिचा पती जुबेद बदर हसन (४०) याचे दुसऱ्या महिले सोबत अनैतिक संबंध होते, तिच्याशी लग्न करण्याकरिता तो चैतालीचा सतत छळ करत होता. याच कारणावरून दोघा नवरा-बायकोमध्ये वाद होत होते. १४ ऑगस्टच्या सकाळी जुबेर याने चैतालीला पेटवून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. चैताली जीवाच्या आकांताने घराबाहेर पडल्याने बचावली, परंतु ती गंभीर जखमी झाली. ही घटना माहिती होताच तिचा भाऊ सचिन बोंदाडे याने तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सचिनच्या तक्रारीवरून जुबेर सिद्दीकी विरुध्द पोलिसांनी रविवारी कलम १०९(१) ८५ बीएनएसनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय घाडगे करीत आहे.


28
कृपया वोट करा

पोलीसनामा च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!